वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हायड्रोजन इंधनावरील पहिली कार १६ मार्च रोजी दिल्लीत धावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. The first car on hydrogen fuel will run in Delhi; Information of Union Minister Nitin Gadkari
ते म्हणाले, सीएनजीवरील वाहनानंतर आता ग्रीन हायड्रोजनवर चालणारी वाहने शहरात आणत आहोत. ग्रीन हायड्रोजनवरील जगात रेल्वे आणि काही देशात कारही धावत आहेत. आता हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत १६ मार्चपासून धावणार आहे. नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार आहोत.
नागपुरात १२ ते १४ मार्चदरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. त्याची माहिती देताना रविवारी ते बोलत होते. ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रक्रिया प्रकल्प महापालिकेकडू शहरात राबवण्यात येणार आहे. कचरा आणि पाण्यातून हे ग्रीन हायड्रोजन इंधन निर्माण केले जाईल. ग्रीन हायड्रोजनचे विदर्भ हे केंद्र असणार आहे.
आणखी वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App