विशेष प्रतिनिधी
अमृतसर : शेतजमीन म्हणजे शेतकºयांची आई. शेतातील पिकाला शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे जपतो. मात्र, पंजाबमधील बर्नाला येथील शेतकºयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या शेतात पेरेलेले धान्य उपटून टाकून शेतकरी धर्मालाच हरताळ फासला. सुमारे एक एकर क्षेत्रावरील भाताची रोपे उपटून टाकले. यामध्ये महिला आंदोलकांचाही समावेश होता.The farmers on strike uprooted the grain from the BJP leader’s field
बर्नाला येथे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाचे नेते हरजितसिंग ग्रेवाल यांच्या शेतावर आंदोलकांनी हल्ला केला. भात शेतात प्रवेश केला आणि सुमारे एक एकरावरील रोपे उपटून टाकली.
युनियन नेत्यांनी दावा केला की ते फक्त एका शेतकऱ्याशी बोलण्यासाठी गेले आहेत. त्यांनी ग्रेवाल यांची जमीन भाड्याने घेतली आहे. परंतु काही संतप्त निदर्शकांनी रोपांचे नुकसान केले.ग्रेवाल हे नव्या कृषि कायद्याचे समर्थक आहेत. मात्र, हाच त्यांचा दोष झाला आहे.
त्यामुळे किसान युनियनच्या नेत्यांनी त्यांच्यावर बहिष्काराचाही इशारा दिला होता. ग्रेवाल यांच्या शेतात कोणीही काम करू नये असे आवाहनही केले होते.शेतकरी नेते बलवंतसिंग उपली म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना ग्रेवाल यांच्या जमिनीवर काम करु नका असे आवाहन केले होते.
तरीही त्यांनी पेरणी केली. आज आम्ही चर्चेसाठी गेलो असता जमावाने अचानक रोपटे उपटले. भाजप नेत्यांविरूद्ध आमचा वैयक्तिक विरोधक नाही पण त्यांनी शेतकºयांंविरूद्ध अपमानास्पद भाषा वापरु नये.
युनियनचे दुसरे सदस्य जगसीर सिंग म्हणाले, शेतकऱ्यांनी यापूर्वी पाच एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यास ग्रेवाल नकार दिला आहे, परंतु त्यांनी एका शेतकºयाला जमीन मोफत दिली. भाजप नेत्याला शेतकºयांमध्ये फूट पाडायची आहे.
धनाला पोलीस ठाण्याचे निरिक्षक विजय कुमार म्हणाले, पोलिसांना काही तक्रार आल्यास पडताळणीनंतर कारवाई केली जाईल.भारतीय किसान युनियनने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीस विरोध दर्शविण्यासाठी संगरूर व बरनाला येथील उपायुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App