सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विराट युद्धनौकेचे तोडकाम सुरूच राहणार


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेचे जतन करून त्याचे रुपांतर पुढे संग्रहालयामध्ये केले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.The demolition of virat warship will continue after the Supreme Court rejects the petition

न्यायालयाच्या या आदेशांमुळे विराटचे सध्या सुरू असलेले तोडकाम तसेच सुरू राहणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत तुम्हाला सरकारकडे सादरीकरण करण्यास सांगितले होते.


सरकारने (संरक्षण मंत्रालय) तुमची मागणी फेटाळून लावली आहे. तुम्ही याला नंतर आव्हान दिले नव्हते.’’ सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

या युद्धनौकेच्या संवर्धनासाठी एनव्हीटेक मरिन कन्सल्टंट प्रा. लिमिटेड या संस्थेकडून करण्यात आलेले सादरीकरण हे संरक्षण मंत्रालयानेच आधीच फेटाळून लावले असल्याची नोंद देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी घेतली. याबाबत आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली.

The demolition of virat warship will continue after the Supreme Court rejects the petition

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात