ओमानच्या आखाताजवळ भरसमुद्रात भरकटलेल्या व्यापारी जहाजाला भारतीय युद्धनौकेने काढले सहीसलामत

विशेष प्रतिनिधी

मुंबई – ओमानच्या आखाताजवळ भरसमुद्रात नादुरुस्त होऊन भरकटलेल्या व्यापारी जहाजाला भारतीय युद्धनौका ‘आयएनएस तलवार’ वरील नौसैनिकांनी साह्य केले. त्यानंतर त्या जहाजाचा पुढील प्रवास सुरू झाला. A merchant ship stranded at sea off the coast of Oman Indian warships removed safely

‘आयएनएस तलवार’ ही युद्धनौका सध्या ओमानच्या आखातात आहे. त्याच परिसरातून जात असलेले व्यापारी जहाज ‘एमव्ही नयन’ याचे इंजिन, जनरेटर, जीपीएस यंत्रणा, दिशादर्शक यंत्रणा आदी बाबी एकामागोमाग एक बंद पडत गेल्या.त्यामुळे ९ मार्चपासून जहाज भरकटत आहे. या जहानाने पाठवलेला संदेश ‘तलवार’वर ११ मार्चला मिळाला. त्याला प्रतिसाद देत प्रथम हेलिकॉप्टरच्या साह्याने ‘एमव्ही नयन’ची प्राथमिक पाहणी करण्यात आली.

नंतर छोट्या नावांमधून सुसज्ज तंत्रज्ञ, नौसैनिकांसह अन्य आवश्यजक बाबी पाठविण्यात आल्या. या जहाजावरील सात कर्मचारी भारतीय असल्याचेही आढळून आले. युद्धनौकेवरील तंत्रज्ञांनी तेथे सात – तास मेहनत करून जहाजाचे इंजिन व जनरेटर दुरुस्त केला. जीपीएस यंत्रणा सुरू झाल्यानंतर ते पुढील प्रवासास निघून गेले.

A merchant ship stranded at sea off the coast of Oman Indian warships removed safely

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*