प्रतिनिधी
नवी दिल्ली : नोटीस देण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक तास प्रतीक्षा करायला लावली. विविध माध्यमांनी दिल्ली पोलिस सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. जानेवारीमध्ये श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात रेप प्रकरणाचा उल्लेख केला होता.The Delhi Police who issued the notice made Rahul Gandhi wait for several hours, sought information from the rape victim
दिल्ली पोलिसांनी याच प्रकरणातील पीडितेची माहिती मागवली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, 15 मार्च रोजी राहुल गांधींना नोटीस बजावण्यासाठी पोलिसांच्या पथकाने 3 तास वाट पाहिली. यानंतरही राहुल गांधी पोलिसांच्या पथकाला भेटले नाहीत. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावण्यासाठी 16 मार्च रोजी पुन्हा त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. दीड तास वाट पाहिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून नोटीस देण्यात आली.
का दिली नोटीस?
दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना लैंगिक छळाच्या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधलेल्या पीडितांची माहिती देण्यासाठी नोटीस बजावली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. पीडितांना सुरक्षा पुरवता यावी म्हणून तपशील मागवला होता.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील महिलांबाबत हे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी आल्याचे सांगितले होते. सोशल मीडिया पोस्टची दखल घेत पोलिसांनी राहुल यांना प्रश्नांची यादी पाठवली आहे. नोटीसमध्ये पोलिसांनी पीडितांची माहिती देण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्यांना सुरक्षा पुरवता येईल.
भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, माझे एका मुलीशी बोलणे झाले होते. तिच्यावर बलात्कार झाला. मी तिला विचारले की आपण पोलिसांना बोलवायचे का? त्यावर ती म्हणाली, पोलिसांना बोलवू नका, बदनामी होईल. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी राहुल गांधींच्या घरी यासंदर्भात नोटीस देण्यासाठी गेले होते. खुद्द राहुल गांधींना ही नोटीस मिळाली आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा 145 दिवसांत सुमारे 4000 किलोमीटरचे अंतर कापून, 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे संपली. जिथे राहुल गांधींनी ऐतिहासिक लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवला. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधून पार गेली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App