ताजमहाल की तेजोमहालय?? : ताजमहालावर जयपूर राजघराण्याचा दावा; पोथीखान्यात दस्तऐवज!!

वृत्तसंस्था

जयपूर : ताजमहाल ही मुस्लिम वास्तु नाही, तर जयपुर राजघराण्याचा तो महाल आहे. आमच्याकडे त्यासंदर्भातले दस्तऐवज आहेत, असा दावा जयपुर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी केला आहे. ताजमहालाच्या दोन मजल्यावरील बावीस खुल्या उघडाव्यात आणि त्यातील हिंदू मूर्ती तसेच हिंदू चिन्हांचे अवलोकन करावे. भारतीय पुरातत्व खात्याला याचे सर्वेक्षण करू द्यावे, अशा आशयाची याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल आहे. या याचिकेचे दिया कुमारी यांनी स्वागत केले आहे. या याचिकेनुसार जर खरच 22 खोल्या उघडले तर त्यातले सत्य बाहेर येऊ शकेल, असे त्या म्हणाल्या.
The claim of the Jaipur dynasty on the Taj Mahal; Documents in the library

ताजमहाल हा जयपुर राजघराण्याच्या मालकीचा होता. त्याच्यावर मोगल बादशहा शहाजहानने जबरदस्तीने कब्जा केला. त्यावेळी मोगल सल्तनत अतिशय प्रबळ असल्याने जयपूरचे राजघराणे शहाजहानला त्यावेळी विरोध करू शकले नाही. त्यावेळच्या मुघल वर्चस्ववादी राज्यव्यवस्थेत कोठेही दाद मागण्याची सोय देखील नव्हती, असे दिया कुमारी यांनी स्पष्ट केले आहे.

आज सरकारने कोणाशीही जमीन ताब्यात घेतली तर सरकार त्याला कायदेशीर दृष्ट्या नुकसानभरपाई द्यायला बांधील आहे. पण मुघल शासन काळात असले कोणतेही कायदे अस्तित्वात नव्हते. त्यामुळे जबरदस्तीने जमीन कब्जात घेतली तरी बादशाहविरुद्ध कुठेही दाद मागण्याची शक्यता देखील उपलब्ध नव्हती, याकडे दिया कुमारी यांनी लक्ष वेधले आहे.


ताजमहाल की तेजोमहालय?? : भारतीय पुरातत्व विभागाला ताजमहलाचे 22 दरवाजे उघडू द्या; अलाहाबाद हायकोर्टात याचिका!!


ताजमहाल तोडला जावा असे आमचे अजिबात म्हणणे नाही. फक्त त्यातल्या दोन मजल्यांवरच्या 22 खोल्या उघडल्या जाव्यात. त्यात नेमकी कोणती चिन्हे आहेत, हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत की नाही याची पाहणी भारतीय पुरातत्त्व खात्याने करावी एवढीच आमची मागणी आहे. त्यातून जे सत्य बाहेर येईल त्यावर आधारित सध्याच्या कायद्यानुसार निर्णय घेतला जावा, असे दिया कुमारी म्हणाल्या.

ताजमहाल हे मंदिर होते की नाही हे माहिती नाही. परंतु ताजमहाल आणि त्याभोवतीची जमीन जयपुर राजघराण्याच्या मालकीची होती. शहाजहानला ताजमहाल आवडल्याने तो त्याने कब्ज्यात घेतला. जयपुर राजघराण्याच्या पोथीखान्यात याविषयीची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. ती आम्ही कोर्टात सादर करायला देखील तयार आहोत. या कागदपत्रांचा नीट अभ्यास करून पुढची कायदेशीर कारवाई काय करायची याबाबतही याबाबत त्यांनी निर्णय घेऊ, असे दिया कुमारी यांनी स्पष्ट केले आहे.

– ताजमहाल की तेजोमहालय??

हा वाद जुना आहे. जयपुर राजघराण्याच्या संदर्भातील कागदपत्रे आपल्याला मिळाल्याचे भाजप म सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील जाहीर केले होते. सध्या अलाहाबाद हायकोर्टाची यासंदर्भातली याचिका डॉ. रजनीश सिंह यांनी दाखल केली आहे. परंतु याखेरीज 2015 मध्ये देखील एक याचिका दाखल झाली आहे. भाजपचे नेते विनय कटियार यांनीदेखील ताजमहाल हा तेजोमहालय असे घोषित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

ताजमहाल एकूण 4 मजल्यांचा आहे त्यातील पहिल्या 2 मजल्यांवरील खोल्यांमध्ये हिंदू चिन्हे आणि हिंदू मूर्ती अस्तित्वात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. जर भारतीय पुरातत्व खात्याला कोर्टाने परवानगी दिली तर या खोल्या उघडून त्याचे पुरातत्व सर्वेक्षण करून सत्य बाहेर आणू शकेल. याखेरीज जयपूर राजघराण्यात आरे असलेल्या दस्तऐवजांचा देखील पुराव्यात किती उपयोग होईल हे ठरवू शकेल.

The claim of the Jaipur dynasty on the Taj Mahal; Documents in the library

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub