महिला समर्थकांच्या दबावातून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नाही; फाडलेल्या राजीनामा पत्राचा व्हिडिओ व्हायरल!!


वृत्तसंस्था

इम्फाळ : गेले दोन महिने हिंसाचाराने पेटलेल्या मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग राजीनामा देणार नाहीत. त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, जेडीयु यांच्यासारख्या पक्षांकडून आणि वेगवेगळ्या गटातून दबाव वाढत चालला होता. त्यातच त्यांची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झाली. त्याचवेळी राहुल गांधींचा मणिपूर दौरा झाला. The Chief Minister of Manipur did not resign due to the pressure of women supporters

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंग राजीनामा देणार असल्याचे वातावरण तयार झाले होते. पण दरम्यानच्या काळात त्यांचा दबाव समर्थकांचाही मोठा दबाव तयार झाला आणि त्या दबावातूनच मुख्यमंत्री बीरेंद्र सिंग राजीनामा देणार नाही हे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली.

पण दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या सही शिक्क्याचे राजीनामाचे एक पत्र फाडलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यातील महिलांच्या वाढल्या पाठिंब्यामुळे राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. राज्यात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंह राजीनामा देणार अशी चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर बिरेन सिंग आज राज्यपालांना भेटून राजीनामा सादर करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार बिरेन सिंग यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला राजीनामा फाडला असून त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री आज राजीनामा देणार अशी चर्चा असतानाच शेकडो महिला त्यांच्या निवासस्थानी जमल्या. बिरेन सिंग यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी करत त्यांनी धरणे धरले. त्यानंतर राज्यातील दोन मंत्र्यांनी बिरेन सिंग यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपले राजीनामा पत्र फाडल्याची माहिती आहे.

मणिपूरमध्ये गेल्या दोन दिवसांत नव्याने हिंसाचार उसळल्यानंतर एका पोलीस हवालदारासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मणिपूरच्या तणावग्रस्त कांगपोकपी जिल्ह्यात झालेल्या चकमकींची माहिती देताना भारतीय लष्कराने सांगितले की, सशस्त्र दंगलखोरांनी हराओथेल गावात गोळीबार केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, याला प्रत्युत्तर म्हणून, परिस्थिती बिघडू नये म्हणून लष्कराने आपले सैनिक तैनात केले.

The Chief Minister of Manipur did not resign due to the pressure of women supporters

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात