सध्या देशात पुस्तकाच्या स्वरुपामध्ये पासपोर्ट दिले जातात. प्रायोगिक तत्वावर सुमारे २० हजार ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत. The central government will soon make e-passports available to Indians
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या भारतात ५०० हून अधिक पासपोर्ट केंद्रे कार्यरत आहेत. त्याचबरोबर देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राची व्यवस्था सुनिश्चित करणे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे ध्येय आहे.दरम्यान परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे की , केंद्र सरकार लवकरच सर्व भारतीयांना ई-पासपोर्ट उपलब्ध करून देणार आहे.तसेच हे नवीन पासपोर्ट बायोमेट्रिकच्या वापरामुळे सुरक्षित असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या देशात पुस्तकाच्या स्वरुपामध्ये पासपोर्ट दिले जातात. प्रायोगिक तत्वावर सुमारे २० हजार ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चीप लावलेल्या असल्याने ते पूर्णत: सुरक्षित आहेत.परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पासपोर्टमधील डेटा सुरक्षिततेची व्यवस्था अशा प्रकारे केली जात आहे की त्यामध्ये कोणतीही छेडछाड सिस्टीममध्ये आढळून येईल. तसेच,अस कोणतही पासपोर्ट वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही.
संजय भट्टाचार्य यांनी या पासपोर्टमुळे परदेशामध्ये जाणाऱ्या नागरिकांना सुलभपणे प्रवास करणे शक्य होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांना ई-पासपोर्ट देण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत असून, प्रक्रियेमध्ये जलदगती आणण्याची अपेक्षा त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App