पंतप्रधान मोदींच्या भाऊ प्रल्हाद मोदींच्या गाडीला म्हैसूरजवळ अपघात, कुटुंबीयांसह रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला आहे. प्रल्हाद मोदी यांच्यासह कारमध्ये त्यांचा मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. The car of Prime Minister Modi’s brother Prahlad Modi met with an accident near Mysore

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा आज, मंगळवारी दुपारी कर्नाटकातील म्हैसूरजवळ अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.

काय आहे घटना?

प्रल्हाद मोदी हे त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवासह बंदीपुरा येथे मर्सिडीज बेंझ कारमधून बंदीपूरला जात होते. दुपारी २ च्या सुमारास कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातावेळी त्यांच्यासह त्यांचा ताफाही प्रवास करत होता. या सर्वांना किरकोळ दुखापतही झाली असून त्यांना म्हैसूर येथील जेएस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The car of Prime Minister Modi’s brother Prahlad Modi met with an accident near Mysore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात