I.N.D.I.A आघाडीची रद्द झालेली बैठक आता ‘या’ तारखेला पार पडणार!

लालू प्रसाद यादव यांनी बैठकीच्या नव्या तारखेबाबत माहिती दिली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: इंडिया आघाडीची 6 डिसेंबरला होणारी बैठक आता 17 डिसेंबरला होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नाराजी दरम्यान, आरजेडी प्रमुख लालू यादव यांनी सांगितले की, 17 डिसेंबरला विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.The canceled meeting of INDIA will now be held on December 17



खरंतर ही बैठक आज होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली होती. तीन राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती.
मात्र नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक नेत्यांनी या बैठकीला येण्यास नकार दिला होता.

यामुळे नाईलाजास्तव ही बैठक ऐनवेळी तहकूब करण्यात आली. आता बैठकीची नवी तारीख समोर आली आहे. राष्ट्रीय जनता दल RJD सुप्रीमो लालू यादव यांनी 17 डिसेंबरची तारीख जाहीर केली आहे.

The canceled meeting of INDIA will now be held on December 17

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात