विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील कोळसा गैव्यवहाराची काळी कहाणी समोर येत आहे. एक आठवी नापास राजकारण्यांच्या वरदहस्ताने कोळसा सम्राट बनला. कोट्यवधी रुपयांची लाच राजकारण्यांनी देऊन त्याने आपले साम्राज्य उभे केले आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि कायदा मंत्री मोलोय घटक यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.The Black Story of Coal Abuse in West Bengal, eight standard dropout become coal tycoon
या घोटाळ्याच्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी अनुप माजी उर्फ लाला आहे. आठवी नापास असलेल्या लालाने आपली बेकायदेशिर धंदे चालविण्यासाठी राजकारण्यांपासून ते वरिष्ठ शासकीय अधिकाºयांना कोट्यवधी रुपयांची लाच दिली. प्राप्ती कर विभागाने (आयटी) केलेल्या चौकशीत अहवालात सुरवातीला १३०० कोटी रुपयांची लाच दिल्याचे म्हटले होते.
गेल्या दीड वर्षांत राजकारण्यांना ही रक्कम देण्यता आली होती. त्याच्या बेहिशोबी व्यवहारात साडेपाच हजार कोटी रुपयांचा उल्लेख आहे. ही रक्कमही त्याने लाचेसाठी वापरल्याचा संशय आहे. बंगालचा कोळसा पट्टा पश्चिम बर्धमान, बांकुरा, बीरभूम आणि पुरुलिया या चार जिल्ह्यांत आणि ३२ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात पसरलेला आहे.
या भागात अनुप माजी याची दहशत आहे. त्याचे सातशे ट्रक आहेत. वर्षानुवर्षे चोरी आणि बेकायदेशीर खाणीमुळे त्रस्त भागात नोव्हेंबरमध्ये सीबीआयची पहिली तक्रार दाखल झाली होती. मे २०२० मध्ये त्याच्या दक्षता शाखेने केलेल्या तपासणीनंतर पश्चिम बर्धमानमधील भाडेपट्टी क्षेत्रामध्ये कोळशाचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन आणि वाहतूक झालेली आढळली.
अवैध कोळसा खनन आणि तस्करी प्रकरणी सीबीआयने अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांनाही नोटीस बजावली आहे. कोळसा प्रकरणातील आर्थिक व्यवहारात सीबीआयला काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्यात रुजीरा यांचं नावही समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App