विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : भारतीय जनता पक्ष आणि कॉँग्रेस दोघेही आमचे समान शत्रू आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत केवळ सहकार्य मागितले आहे. आम्ही निवडणुकीत युती करत नाही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.The BJP and the Congress are our common enemies. D. Kumaraswamy made it clear
जनता दल ज्या जागांवर निवडणूक लढवित नाही त्याठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशी विनंती येडियुरप्पा यांनी केली आहे. याबाब जनता दलाची (धर्मनिरपेक्ष)भूमिका मंगळवारी स्पष्ट करणार आहे. बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेईन जिथे मी सर्व विषयांवर बोलेन,
असे सांगून ते म्हणाले मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी आजवर कुठेही दुसºया पक्षाशी युती करेन असे म्हटलेले नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष (एच डी देवेगौडा) एवढेच म्हणाले की जिथे आम्ही आमचा उमेदवार नाही तेथे काय करायचे ते कुमारस्वामीच ठरवतील.
काँग्रेस किंवा भाजपने आतापर्यंत जनता दलाचा पाठिंबा मागितलेला नाही. केवळ येडियुरप्पा यांनी दोन वेळा पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.कुमारस्वामी म्हणाले, येडियुरप्पा यांनी असेही स्पष्ट केले आहे की भाजप आणि जेडी(एस) यांच्यात कोणतीही युती नाही. त्यांनी फक्त या निवडणुकीत सहकार्य मागितले आहे. युती म्हणजे उघडपणे समजून घेणे आणि निवडणुकीसाठी पाठिंबा देत प्रचारासाठी जाणे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App