विशेष प्रतिनिधी
लखनऊ : तीन कृषि कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून सुरू होती. कृषि कायद्यांमध्ये शाईशिवाय काहीही काळे नव्हते, असे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले.The agitation against the agricultural laws came from the battle for the supremacy of the farmers’ unions, there was nothing black in the law except ink, V. K. Singh’s allegation
उत्तर प्रदेशातील बस्ती येथे बोलताना व्ही. के. सिंह म्हणाले, कृषि कायद्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांना फायदाच होणार होता. मात्र, शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून आंदोलन झाले. कधी कधी आपल्याला चांगले काय वाईट काय हे माहित असते. पण जर डोळे बंद करून दुसऱ्यांचेच अनुकरण केले जाते.
मी एका शेतकरी नेत्याला विचारले होते की आपण ज्याला काळा कायदा म्हणता त्या कायद्यामध्ये काळे काय आहे? यावर त्याला उत्तर देता आले नव्हते. त्यावर मी म्हटले होते की कायदा लिहिण्यासाठी वापरलेल्या शाईशिवाय काहीही काळे नव्हते.शेतकरी संघटनांच्या आपसांतील वर्चस्वाच्या लढाईत ते छोट्या शेतकऱ्यांना लाभ देऊ इच्छित नाहीत.
त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषि कायदे मागे घ्यावे लागले. वास्तविक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मोदी सरकारने खूप काम केले आहे. कृषि कायदेही शेतकऱ्यांसाठी फायद्याचेच होते. मात्र, त्यामध्ये राजकारण करण्यात आले. त्यामुळे देशातील वातावरण बिघडू नये म्हणून कृषि कायदे मागे घ्यावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App