PM किसानचा 14वा हप्ता आज येणार, पण 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी चेक करा यादी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या चार महिन्यांपासून 12 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांची चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे. पीएम किसान 27 जुलै रोजी म्हणजेच आज पीएम किसान लाभार्थ्यांसाठी 14 वा हप्ता सीकरमधून हस्तांतरित करतील. पीएम किसान पोर्टलनुसार, मोदी सरकार 27 जुलै रोजी 8.5 कोटी शेतकऱ्यांना 14 वा हप्ता जारी करेल, याचा अर्थ आज सुमारे साडेतीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. The 14th installment of PM Kisan will come today

पीए किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर कारवाई केली तेव्हा पूर्वीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली. एप्रिल-जुलै 2022-23 चा हप्ता 11.27 कोटी शेतकऱ्यांना मिळाला. परंतु, ऑगस्ट-नोव्हेंबर 2022-23 मध्ये केवळ 8 कोटी शेतकऱ्यांना हप्ता मिळाला. डिसेंबर-मार्च 2022-23 मध्ये ही संख्या 8.80 कोटी इतकी कमी झाली. म्हणजेच घोटाळेबाजांवर मुसक्या आवळल्याचा परिणाम दिसून येत आहे.



असे चेक करा स्टेटस

पीएम किसान पोर्टलवर लाभार्थी स्थिती अर्थात बेनेफिशियरी स्टेटस पाहण्यासाठी, तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी पोर्टलवर दिलेल्या लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर Get Data वर क्लिक करा. तुमची स्थिती तुमच्या समोर असेल. पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये मिळतात.

तुमचे नाव यादीतून वगळले तर नाही ना?

तुम्हालाही आगामी हप्ता तुमच्या खात्यात येईल की नाही हे पाहायचे असेल तर लगेच यादी तपासा. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा…

स्टेप-1: सर्वप्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. येथे Beeficiary List वर क्लिक करा किंवा टॅप करा.

स्टेप-2 : यानंतर स्टेट बॉक्समध्ये तुमच्या राज्याचे नाव निवडा. डिस्ट्रिक्ट फील्डमध्ये तुमचा जिल्हा निवडा, नंतर तुमच्या तालुक्याचे नाव. त्याच्या ब्लॉकचे नाव भरा आणि नंतर Get Report वर क्लिक करा. तुम्हाला पीएम किसानच्या लाभार्थींची यादी मिळेल. जर तुमचे नाव वगळले गेले नसेल तर ते नक्कीच त्यात असेल.

The 14th installment of PM Kisan will come today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात