अशोक चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसही फुटली; ठाकरे – पवारांना मिळाली अधिक कुरघोडीची संधी!!

नाशिक : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर काँग्रेस फुटीला सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर आमदार माजी आमदार अमर राजुरकरही काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे राज्यसभेचे गणित पूर्ण विस्कटले आहे. नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस संघटनाच पूर्ण मोडकळीत निघून तिच्यातले नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये आले, पण काँग्रेसमध्ये या सगळ्या फुटीच्या घडामोडी घडत असल्यामुळे महाविकास आघाडी ठाकरे – पवारांना उरलेल्या काँग्रेस वर जास्त कुरघोडीची संधी मिळाली आहे. Thackeray pawar gets opportunity to override Congress leaders on negotiating table

तसेही उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपल्या मर्यादित राजकीय ग्लॅमरच्या बळावर काँग्रेसच्या नेत्यांवर जागावाटपाच्या चर्चेत कुरघोडी करतच होते. ठाकरे आणि पवारांकडे त्यांच्या पक्षाची मूळ संघटना उरली नसली, तरी त्यांच्या नावावर जे थोडेफार आमदार खासदार आणि कार्यकर्ते उरले आहेत, त्यांच्या बळावर पण स्वतःच्या वैयक्तिक मर्यादित करिष्म्याच्या बळावर ते काँग्रेसवर कुरघोडी करू शकत होते. कारण काँग्रेसकडे नेत्यांची मांदियाळी होती, पण तिचे ग्लॅमर ठाकरे – पवारांएवढे मोठे नव्हते.



नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते जागा वाटपाच्या वाटाघाटीत काँग्रेस कडून आघाडीवर होते. वास्तविक अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री. त्यामुळे वाटाघाटींमध्ये त्यांचा वरचष्मा अपेक्षित होता. पण काँग्रेसच्या अंतर्गतच पक्ष संघटनात्मक रचनेमुळे दोन्ही चव्हाणांना त्यांचे राजकीय ग्लॅमर दाखवून वाटाघाटींमध्ये वर्चस्व मिळवता येत नव्हते.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत नेमकी हीच कोंडी होत असल्याची कबुली दिली आहे. काँग्रेसकडे संघटना आहे. नेते आहेत, पण जिंकण्याची जिद्द नाही. जिंकण्याचे नियोजन नाही. तशी रणनीती नाही. या सगळ्याचा अभाव असल्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात प्रभावहीन ठरली आहे, हे अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या राजकीय विकाराचे निदान केले. ते अक्षरशः खरे आहे.

अशोक चव्हाण काय किंवा पृथ्वीराज चव्हाण काय यांना ठाकरे – पवारांचे वर्चस्व सहन करणे स्वीकारावे लागत होते. वास्तविक राजकीय गुणवत्ता या आधारावर पृथ्वीराज चव्हाण हे ठाकरे पवारांना कितीतरी भारी पडू शकणारे नेते आहेत. पण काँग्रेसमध्ये ना त्यांना संधी मिळाली, ना अशोक चव्हाण यांना. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता अशोक चव्हाण यांनी पक्षातून बाहेर पडून तिला मोकळी वाट करून दिली आहे.

– कुरघोडी करू द्यायची नसेल तर…

पण या निमित्ताने ठाकरे – पवारांना मात्र उरलेल्या काँग्रेस वर कुरघोडी करण्याची संधी मिळाली आहे. अशोक चव्हाण फुटल्यानंतर महाविकास आघाडीत ठाकरे – पवारांना गुरुगोडी करण्याची संधी द्यायची नसेल, काँग्रेसची कोंडी टाळायची असेल, ठाकरे – पवारांमागे काँग्रेसची परवड होऊ द्यायची नसेल, तर आजही उरलेल्या काँग्रेस नेत्यांमधून म्हणजेच बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातून नवा नेता निवडून काँग्रेसला वाटचाल करावी लागणार आहे. त्यातही पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली, तर पवारांसमोर सक्षमतेने वाटाघाटींच्या टेबलवर बसणारा नेता काँग्रेस मधून पुढे येऊ शकेल आणि महाविकास आघाडीत काँग्रेससाठी सन्मानजनक वाटा मिळवू शकेल. अशी निदान आज 13 फेब्रुवारी 2024 ची अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या दिवशीची राजकीय स्थिती आहे.

Thackeray pawar gets opportunity to override Congress leaders on negotiating table

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात