विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: सोपोर परिसरात आज सकाळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या टीमवर हल्ला केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. Terrorists attack CRPF, Joint Police Team in Jammu and Kashmir’s Sopore
काश्मीरच्या उत्तरेकडील सोपोर येथील आरामपोरा परिसरात अतिरेक्यांनी हा हल्ला केला. अतिरेक्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या टीमला लक्ष्य केलं होतं. त्यामुळे पोलिस आणि जवानांनीही अतिरेक्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून तीन नागरिक ठार झाले आहेत. अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर या अतिरेक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
या आधी शोपियां जिल्ह्यात शुक्रवारी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या टीमवर हल्ला केला होता. दक्षिण काश्मीरच्या जैनपोरा परिसरातील अगलरमध्ये हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आणि जवानांनी या संपूर्ण परिसराला घेराव घालून अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, हे अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App