विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरविणो राष्ट्रीय तपास संस्थेच्या ( एनआयए) रडारवर आले आहेत. एनआयएच्या पथकांनी बारामुल्ला परिसरात अनेक ठिकाणी छापे टाकले. अकरा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहेत.Terrorist financer on NIA radar, raids in several places in Kashmir
मुस्तफाबाद झैनाकोट, नौगाव आणि चनापोर या परिसरात ११ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. १० लाख रुपयांचे इनाम असलेला कडवा दहशतवादी बासित अहमद डार याच्या कुलगाम जिल्ह्यातील घरावरही छापा टाकण्यात आला. मात्र, आपल्या पाकिस्तानी साथीदारांसोबत डार अज्ञात ठिकाणी दडीमारुन बसला आहे.
एनआयएनच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द रेसिस्ट फ्रंट आणि लष्कर-ए-तैयबाच्या पाकिस्तानस्थित कमांडरचे संबंध आहेत. त्याचा छडा लावण्यासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. अनेक डिजिटल उपकरणे, मोबाईल सीमकार्डसह आक्षेपार्ह दस्तावेज धाडीदरम्यान जप्त करण्यात आले आहेत.
एनआयएसोबत सीमा सुरक्षा दलाकडूनही कडक तपास सुरू आहे. जम्मूतील अख्नूर भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आली आहेत. भारतविरोधी उपद्रवखोर भारतीय हद्दीत शस्त्र आणि दारुगोळ्यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार सीमेवरील कुंपण परिसरासह आंतरराष्ट्रीय सीमेनजीक गस्त वाढविण्यात आली. आंतरराष्ट्रीय सीमेनजीक तपासणीदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एक पिशवी आढळली. यात एके-४७ रायफल, या रायफलीच्या २० गोळ्या, दोन गोळ्यांचे पट , दोन इटालियन बनावटीच्या पिस्तूल आणि ४० काडतुसे आढळली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App