विशेष प्रतिनिधी
कोलकाता : कोरोनाने सगळ्यांनाच भरपूर अनुभव दिले आहेत .या अनुभवांनी डॉक्टर्सच्या भावना देखील अनावर होत आहेत . या महामारीमध्ये अनेकांना आपल्या प्रियजनांना नीट अखेरचा निरोपही देता येत नाही. कोरोनावर उपचार घेणाऱ्या एका मातेची शेवटची इच्छा होती मुलाच गाणं ऐकण्याची…डॉक्टर डॉ. दीपशिखा घोष यांनी ती पुर्णही केली …आणि त्या मातेने जगाचा निरोप घेतला .मात्र अखेरचा श्वास घेण्याआधी लेकासोबत घालवलेले व्हर्चुअल क्षण त्या माऊलीला सुखावून गेले तर लेकासाठी ते क्षण आयुष्याभर स्मरणात राहतील. तेरा मुझसे है पहले का नाता कोई …सोहम चटर्जीचा आईला अखेरचा निरोप !
डॉ. दीपशिखा घोष यांनी आपल्याला आलेला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. “माझ्या शिफ्टच्या अखेरीस मी मृत्यूशय्येवर असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल केला. आमच्या हॉस्पिटलमध्ये मी सहसा अशा गोष्टी करते, जेव्हा एखाद्या रुग्णाची किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असते. या रुग्णाच्या मुलाने माझा काही वेळ मागितला. त्यानंतर त्याने आपल्या मरणासन्न अवस्थेतील आईसाठी गाणे गायले” असे डॉ. दीपशिखा घोष यांनी लिहिले आहे.
“त्या तरुणाने ‘तेरा मुझसे है पेहले का नाता कोई’ हे गाणं गायलं. मी तिथे फोन धरुन स्तब्ध उभे होते. त्याच्याकडे पहात होते, त्याच्या आईकडे पाहत होते आणि त्याचं गाणं ऐकत होते. माझ्या बाजूला काही नर्स येऊन शांतपणे उभ्या राहिल्या. तो गाता-गाता मध्येच रडू लागला, परंतु त्याने गाणं पूर्ण केलं. त्याने आईची खुशाली विचारली, माझे आभार मानले आणि फोन ठेवून दिला.” असं पुढे डॉक्टरांनी लिहिलं आहे.
Today, towards the end of my shift, I video called the relatives of a patient who is not going to make it. We usually do that in my hospital if it’s something they want. This patient’s son asked for a few minutes of my time. He then sang a song for his dying mother. — Doctor (@DipshikhaGhosh) May 12, 2021
Today, towards the end of my shift, I video called the relatives of a patient who is not going to make it. We usually do that in my hospital if it’s something they want. This patient’s son asked for a few minutes of my time. He then sang a song for his dying mother.
— Doctor (@DipshikhaGhosh) May 12, 2021
सोहम चटर्जीचा आईला अखेरचा निरोप
“त्यांच्या परवानगीने नावं सांगते, वरील उल्लेख केलेल्या व्यक्ती म्हणजे श्रीमती संघमित्रा चटर्जी आणि त्यांचा मुलगा सोहम चटर्जी आहेत. माझ्याकडून तुमचं मनापासून सांत्वन. आपण, आपला आवाज, आपली प्रतिष्ठा हाच त्यांचा वारसा आहात.” असंही डॉ. दीपशिखा घोष यांनी लिहिले आहे.
रुग्णालयातील सगळेच स्तब्ध
“मी आणि नर्स तिथेच उभ्या राहिलो. आम्ही आमची डोकी हलवली, आमचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. नर्स एक-एक करून त्यांच्या रुग्णांकडे गेल्या. या गाण्याची परिभाषा आमच्यासाठी बदलली आहे, किमान माझ्यासाठी तरी नक्कीच बदलली आहे. हे गाणं माझ्या दृष्टीने नेहमीच त्यांचं असेल.” असं डॉ. घोष लिहितात.
With permission, the people mentioned here are Mrs Sanghamitra Chatterjee and her son Mr Soham Chatterjee. My deepest condolences. You, your voice, your quiet dignity, are her legacy. @sohamchatt — Doctor (@DipshikhaGhosh) May 13, 2021
With permission, the people mentioned here are Mrs Sanghamitra Chatterjee and her son Mr Soham Chatterjee. My deepest condolences. You, your voice, your quiet dignity, are her legacy. @sohamchatt
— Doctor (@DipshikhaGhosh) May 13, 2021
सोहम चटर्जी यांनी फेसबुकवरुन तो तरुण म्हणजे आपणच असल्याचं सांगतिलं आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता जिल्ह्यात कांकुरगाची येथील अपोलो ग्लेनइगल्स रुग्णालयातील ही घटना आहे. आईने बुधवारी पहाटे आमचा निरोप घेतला, असं सोहमने सांगितलं .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App