वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य चीनने माघारी घेतले तरच तणाव कमी होईल, अशा शब्दात लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चीनला खडसावले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. Tensions will not go away without a Military withdrawal , Army chief’s clear message to China
एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची भूमिका जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सध्या एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सैन्याची भूमिका स्पष्ट भूमिका आहे.
भारतीय सैन्याची उंचावरील सर्व महत्त्वपूर्ण तळांवर मजबूत पकड आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी राखीव सैनिक सज्ज ठेवले आहे, अशी माहितीही नरवणे यांनी दिली. पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्यकपातीबाबत करार केल्यानंतर चिनी सैन्याने उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App