पहलगाममध्ये पारा उणे 3.3 अंशांवर; जम्मू-काश्मीरसह 7 राज्यांत पावसाची शक्यता, देशात थंडी वाढणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीरसह सात राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात थंडी वाढणार आहे.Temperature at minus 3.3 degrees in Pahalgam; Chance of rain in 7 states including Jammu and Kashmir, cold will increase in the country

स्कायमेटच्या मते, जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या वरच्या भागात हलक्या पावसासह हिमवर्षाव होऊ शकतो. याशिवाय ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली-NCR चा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) गंभीर श्रेणीत राहील.



गेल्या 15 दिवसांत पहिल्यांदाच गुरुवारी काश्मीरमधील पारा 40.9 अंशांच्या वर राहिला. पहलगाम आणि अनंतनाग येथे उणे 3.3 अंशांसह सर्वात थंडीची नोंद झाली. तर गुलमर्गमध्ये उणे दोन अंश तापमानाची नोंद झाली. बांदीपोरा, बारामुल्ला, गंदरबल, कोकरनाग, कुलगाम, कुपवाडा या भागात तापमान शून्य ते 1.7 अंशांच्या दरम्यान राहिले.

दिल्लीत थंडीसोबत धुके वाढत आहे

थंडीसोबतच दिल्लीतही धुके वाढू लागले आहे. राजधानी दिल्लीतील हवेने शुक्रवारी पुन्हा एकदा धोकादायक पातळी गाठली आहे. राजधानीचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 388 होता. अनेक भागांत AQI 400च्या पुढे नोंदवला गेला. पुसा येथे 403, आयआयटी दिल्लीमध्ये 579, लोधी रोड परिसरात 359 एक्यूआय नोंदवले गेले.

दिल्ली विद्यापीठ परिसरात आणि विमानतळ (टर्मिनल-3) परिसरात AQI 386 आणि 398 नोंदवले गेले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, आनंद विहारमधील AQI 411 होता. अलीपूर, वजीरपूर आणि आरकेपुरममध्ये ‘गंभीर’ श्रेणीमध्ये 432, 443 आणि 422 चा AQI नोंदवला गेला.

तामिळनाडूत गेल्या 24 तासांत मोसमातील सर्वाधिक पाऊस

तामिळनाडूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोईम्बतूर जिल्ह्यातील मेट्टुपलायम परिसरात 373 मिमी, तर निलगिरीमध्ये 369.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मोसमातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. अनेक जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

केरळमध्येही पाऊस

गेल्या 24 तासांत केरळमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडूमध्ये एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस झाला. कर्नाटक, रायलसीमा, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडला. सिक्कीममध्ये एक-दोन ठिकाणी हलका पाऊस झाला.

मध्य प्रदेशात आजपासून पावसाची शक्यता

मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि उज्जैनसह विविध जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 28-29 नोव्हेंबरनंतर दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.

Temperature at minus 3.3 degrees in Pahalgam; Chance of rain in 7 states including Jammu and Kashmir, cold will increase in the country

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात