तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी जारी केला आहे आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : Telangana रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला. याअंतर्गत, संपूर्ण रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे.Telangana
सरकारी आदेशानुसार, या कर्मचाऱ्यांना २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांच्या कार्यालये आणि शाळांमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, जर कोणत्याही कर्मचाऱ्याचे काम जास्त आवश्यक असेल तर त्याला कार्यालयातच राहावे लागेल, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी हा आदेश जारी केला आहे.
या प्रकरणी शांती कुमारी यांनी १५ फेब्रुवारी जारी केलेल्या पत्राद्वारे असे म्हटले आहे, की तेलंगणा सरकारने पवित्र रमजान महिन्यात राज्यात काम करणाऱ्या सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी आणि आउटसोर्सिंग कर्मचारी, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट दिली आहे.
तेलंगणा सरकारचा हा निर्णय राज्यातील मुस्लिमांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मात्र, या निर्णयावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी या आदेशाला मुस्लिम समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न म्हटले. ते म्हणाले की, नवरात्रीसारख्या हिंदू सणांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना अशी कोणतीही सूट मिळत नाही. त्यांनी याला व्होट बँकेचे राजकारण म्हटले आणि यास विरोध करण्याबद्दल बोलले.
त्याच वेळी, भाजपचे ज्येष्ठ नेते पी मुरलीधर राव यांनीही मुख्यमंत्र्यांवर आरोप केले की, तेलंगणा सरकार समाजातील एका घटकाला प्राधान्य देत आहेत. ते म्हणाले की, रमजान दरम्यान मुस्लिम कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, ज्या नवरात्र किंवा जैन सणांमध्ये दिल्या जात नव्हत्या. हे धार्मिक प्रथांचा आदर करण्याचे लक्षण नसून मतपेढीच्या राजकारणाचा भाग आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App