जाणून घ्या, गृहमंत्री अमित शाह या संघटनेबाबत नेमकं काय म्हणाले आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी विचारसरणीबाबत मोदी सरकारची मोठी कारवाई समोर आली आहे. तेहरीक-ए-हुर्रियत जम्मू-काश्मीर संघटनेला भारत सरकारने बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. भारत सरकारच्या या पावलावर गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. ही संस्था बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे.Tehreek-e-Hurriyat declared an illegal organisation Amit Shahs announcement
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, तेहरीक-ए-हुरियत जम्मू काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी विचारसरणीला चालना देण्यासाठी काम करत होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू-काश्मीरला UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे.
गृहमंत्र्यांनी X वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ही संघटना जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करून इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या प्रतिबंधित कारवायांमध्ये सामील आहे. हा गट भारतविरोधी प्रचार करत आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत दहशतवादी कारवाया करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत, भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटनेव तत्काळ कारवाई केली जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App