२३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Rohit Sharma १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. तर टीम इंडिया आपले सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळणार आहे. दरम्यान, शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुबईला रवाना झाली आहे.Rohit Sharma
टीम इंडियाच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे, जो टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. परंतु तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ही ट्राफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तर यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला संघात संधी मिळाली आहे. आता हे दोन्ही खेळाडू स्पर्धेत कशी कामगिरी करतात हे पाहावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App