विशेष प्रतिनिधी
चेन्नई : विधानसभा निवडणुकांनतर कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता तमिळनाडूने देखील लॉकडाउनची घोषणा केली आहे. १० मे ते २४ मे पर्यंत राज्यात लॉकडाउन लागू असेल. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. Tamilnadu declares lockdown
दरम्यान, तमिळनाडूत काल गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २६,४५५ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण बाधितांची संख्या १३,२३,९६५ वर पोचली आहे. तसेच १९७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या १५,१७१ वर पोचली आहे. काल २२,३८१ जणांना घरी सोडण्यात आले.
लाॅकडाऊन केला नसता तर….
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले की, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतल्यानंतर आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राज्यात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. राज्यात दहा मे रोजी पहाटे चारपासून ते २४ मे रोजी पहाटे चार पर्यंत संपूर्णपणे लॉकडाउन लागू असेल. अत्यावश्य क सेवांना या काळात सवलत देण्यात आली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यातील ऑक्सिजन टंचाई पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. त्यांनी राज्याला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करावा, असे आवाहन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App