लाॅकडाऊन केला नसता तर….


कोविड आणि लाॅकडाऊनला एक वर्ष पुर्ण झाले आहे …लॉकडाउन योग्य की अयोग्य? यावर बरीच मतमतांतरे आढळून येतात. त्यानिमीत्ताने ‘ द फोकस इंडिया ‘ चे विश्लेषक श्रीकृष्ण उमरीकर यांच्या लेखणीतून हे विश्लेषण …If it hadn’t been for the lockdown ..


 

 

गेल्या वर्षी केंद्राने अचानक लाॅकडाऊन जाहीर केला आणि देशात बरेच काही बदलून गेले. कायमचे. अचानक ठप्प झालेल्या व्यवहारांमुळे अनेक लोकांना मोठ्या अडचणीत टाकले. अनेकांचे हाल झाले. नेमके त्याचेच भांडवल करून विरोधक सरकारला धारेवर धरत असतात. मात्र लाॅकडाऊन केला नसता तर काय परिस्थिती झाली असती याचा विचार विरोधकांनी केला नाही हे स्पष्ट आहे.

हैदराबाद IIT चे प्रोफेसर विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तीने याचा अभ्यास करून लाॅकडाऊन केला नसता तर काय झाले असते या संदर्भात निष्कर्ष काढला आहे.

ते सांगतात की लाॅकडाऊन केला नसता तर जून च्या अखेरीस देशात एकूण १४० लाख कोविड चे रूग्ण असले असते आणि त्याचा प्रसार शिखरावर असताना ५० लाख रूग्ण असले असते. मात्र लाॅकडाऊन केल्या मुळे जून मधे ६ लाख पेक्षा कमी रूग्ण होते आणि सप्टेंबर महिन्यात जेंव्हा रूग्ण संख्या शिखरावर होती ती केवळ १० लाख होती.

येवढेच नाही तर लाॅकडाऊन केला नसता तर २६ लाख रूग्णांचा मृत्यू झाला असता तसेच लाॅकडाऊन एक महिना उशिराने केला असता तरीही किमान १० लाख रूग्णांचा मृत्यू झाला असता असेही या अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे. देशात आजवर कोविडचे एकुण मृत्यू २ लाखांपेक्षा कमी आहेत.

 

कोविडला एक वर्ष झाले तरीही आज महाराष्ट्रा सारख्या आर्थिक स्थिती चांगली असलेल्या सुधारलेल्या राज्यात करोनाची परिस्थिती भयानक आहे. परभणी, औरंगाबाद येथे रूग्णांना रूग्णालयात जागा मिळत नाही. इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे ते आपण जाणतोच. जनतेला वार्‍यावर सोडून सरकार वेगळ्याच ‘कामांत’ गुंतलेले आहे. हे चित्र करोनाला एक वर्ष झाल्यानंतर चे आहे. जर लाॅकडाऊन केला नसता तर परिस्थिती प्रो. विद्यासागर यांच्या अंदाजापेक्षा जास्त भयानक असली असती असे मला वाटते. कारण विद्यासागर यांनी विषाणूचा प्रसार कसा झाला असता याचा अंदाज अचुकपणे लावला आहे मात्र जनतेची सेवा करण्याऐवजी खंडणी वसूल करण्यात मग्न असलेल्या सरकारचा नाकर्तेपणा त्यांच्या गणिती प्रारूपात गृहित धरल्या गेला नसेल. दानवांना शोभेल असा क्रुरपणा मानवाकडून त्यांना अपेक्षित नसावा…..

If it hadn’t been for the lockdown ..

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती