तामिळनाडू : फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी

तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील कुरुविमलाई गावात आज फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा ठार, अनेक जखमी झाले आहेत. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळीची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या होत्या.  यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. Tamil Nadu  Six dead several injured in an explosion at a firecracker warehouse in Kuruvimalai village of Kancheepuram district

करोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय आढावा बैठक

जखमी लोकांनी रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अशी माहिती कांचीपुरमच्या जिल्हाधिकारी एम आरती यांनी म्हटलं आहे. याशिवाय लवकरच याप्रकरणी मोठी कारवाई केली जाईल. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही सांगितले आहे. अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर पोलीस कारवाई करणार आहेत.

मार्चमध्येही घडली होती दुर्घटना –

मार्चमध्ये कुड्डालोर जिल्ह्यातील शिवनारपुरम गावात फटाक्यांच्या शेडला आग लागली होती. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले होते. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

Tamil Nadu  Six dead several injured in an explosion at a firecracker warehouse in Kuruvimalai village of Kancheepuram district

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात