वृत्तसंस्था
चेन्नई : कोलकात्याच्या बलात्कार-हत्या प्रकरणानंतर तामिळनाडूतील ( Tamil Nadu )वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (14 ऑगस्ट) रात्री कोईम्बतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (सीएमसीएच) घडली. गुरुवारी (15 ऑगस्ट) ही माहिती समोर आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रात्री 9 च्या सुमारास ट्रेनी डॉक्टर (हाऊस सर्जन) डीनच्या ऑफिसजवळ पार्क केलेली तिची स्कूटर घेण्यासाठी गेली होती. तिथे एक 25 वर्षांचा तरुण उपस्थित होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसमोर त्याने आपली पॅन्ट काढली आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरने त्याला ढकलून दिले आणि हॉस्पिटल कॅम्पसमधील तिच्या वसतिगृहाकडे धाव घेतली. यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. यानंतर दुसऱ्या डॉक्टरने तातडीने रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली.
रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी वॉर्डमधून आरोपीला पकडले
रात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपीला हॉस्पिटलच्या कॅज्युल्टी वॉर्डमध्ये पकडण्यात आले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. 25 वर्षीय मयंक गालार असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मध्य प्रदेशातील होशंगाबादचा रहिवासी आहे. तो रेल्वे स्थानकावर हिंडत होता. तेथून मेडिकल कॉलेज गाठले.
मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. ए. निर्मला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की आमचे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी होते. पोलिसांनी येऊन आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 आणि तामिळनाडू महिला छळ प्रतिबंध कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App