वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने गुन्हेगारांना कठोर शिक्षेची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. यात हात कलम करण्याबरोबरच फाशी देण्याची शिक्षेची समावेश आहे. Taliban orders new rules for punishment
तालिबान संघटनेच्या संस्थापकांपैकी एक मुल्ला नुरुद्दीन तुराबी म्हणाला, तालिबानच्या मागील सरकारमध्ये कोणत्याही स्टेडिअममध्ये फाशीची शिक्षा अगदी सहजपणे दिली जात असे. ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. स्टेडिअममध्ये फाशी दिली जात असल्याने सर्वांनी आमच्यावर टीका केली, पण आम्ही त्यांचे कायदे व शिक्षेबाबत काहीही टिपण्णी केली नाही. आम्ही कोणते कायदे लागू करावेत, हे इतरांनी आम्हाला सांगू नये.
तालिबानच्या पूर्वीच्या सरकारमध्ये तुराबी न्याय मंत्री होता आणि तथाकथित पुण्यण प्रचार विभागाचा उपाध्यक्ष होता. त्याच्याच आदेशानुसार धार्मिक पोलिस कोणालाही पकडून इस्लामी कायद्याच्या नावाखाली कठोर शिक्षा सुनावत असत. त्यावेळी अशा शिक्षेवरून तालिबानची जगभरात निंदा होत असे. अपराध्याला स्टेडिअममध्ये किंवा खुल्या मैदानात फाशी दिली जात असे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App