विशेष प्रतिनिधी
काबूल : बंडखोरी होत असलेल्या बाघलान प्रांतात आपला वचक निर्माण व्हावा म्हणून तालिबानी दहशतवाद्यांनी एका लोकप्रिय लोकगीत गायकाची हत्या केली आहे. फवाद अंदाराबी असे त्यांचे नाव आहे. फवाद यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना शेतामधील घरातून बाहेर नेण्यात आले आणि डोक्यात गोळी झाडण्यात आली. Taliban killed local singer in Afghanistan
घिचाक हे सतारीसारखे तंतुवाद्य फवाद वाजवायचे. ते पारंपारिक लोकगीते गायचे. जन्मभूमी, देशबांधव आणि एकूणच अफगाणिस्तानवर त्यांची गिते आधारलेली असत. एका ऑनलाइन व्हिडिओत पर्वतांच्या पार्श्वभूमीवर गालिचावर बसलेले फवाद तन्मयतेने गात असल्याचे दिसते. बाघलान हा प्रांत काबूलच्या उत्तरेस सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. पहाडी भागातील या घटनेमुळे तालिबानची जुलमी राजवट पुन्हा निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले.
फवाद यांचे पुत्र जावाद यांनी एका सांगितले की, तालिबानी याआधी आमच्या घरी आले होते आणि त्यांनी झडती घेतली होती. त्यावेळी ते वडिलांबरोबर चहा सुद्धा प्यायले होते, त्यानंतर मात्र शुक्रवारी काहीतरी बिघडले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App