वृत्तसंस्था
ब्रसेल्स : तालिबान आणि पाकिस्तान हे जागतिक समुदायासाठी धोकादायक बनले आहेत. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची गरज बेल्जियमचे खासदार फिलिप यांनी व्यक्त केली. पाकिस्तान वर्षानुवर्षे दहशतवादाला पाठिंबा देत आहे. त्याने तालिबानला मदतही केली आहे. त्यामुळे तालिबान अफगाणिस्तान काबीज करू शकला आहे. Taliban and Pakistan a threat to global community: Belgium MP Philippe
ब्रसेल्स प्रेस क्लबमध्ये बेल्जियम खासदार फिलिप ड्विंटर म्हणाले,पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला तो पाठींबा देत आला आहे. तालिबानला पाठींबा देताना तो तेच करत आहे. तालिबान व पाकिस्तान बरोबर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पाकिस्तानला वाळीत टाकण्याची गरज आहे. अंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला पूर्णपणे वाळीत टाकावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, पाकिस्तान आशिया खंडासह जगाला धोकादायक बनला आहे. विविध भाग काबीज करण्याचे त्याचे मनसुबे आहेत. त्यासाठी तो आधी भाग पोखरतो आणि तेथे अस्थिरता निर्माण करतो. पाकिस्तानकडे सैन्यासह दहशतवादाची मोठी ताकद आहे. त्या द्वारे त्यांनी तालिबानच्या सहाय्याने अफगाणिस्तान बळकावला.अमेरिकेने सैन्य मागे घेतल्यानंतर इस्लामी कट्टरवाद्यांना फूस लावली. त्याला सिरियापासून युरोप पर्यंत कट्टरवाद पसरवायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more