परीक्षेला उत्सवी वातावरणात सामोरे जा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : परीक्षेला उत्सवी वातावरणात सामोरे जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मोदी यांनी विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. Take the exam in a festive atmosphere: Prime Minister Narendra Modi’s appeal

परीक्षेची भिती, ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला. तत्पूर्वी कलाकृतींच्या प्रदर्शनालाही मोदींनी भेट दिली. सुमारे १५ लाख विद्यार्थी आणि अडीच लाख शिक्षकांनी देशभरातून या कार्यक्रमाला हजेरी लावली.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन केले जात होते. यंदा हा कार्यक्रम नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये प्रथमच ऑफलाइन झाला.



शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘कोरोनाच्या खडतर काळानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आज ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम करतो आहोत, याचा आनंद आहे. भावी पिढी तयार करण्यासाठी घरातल्या कुटुंबप्रमुखांच्या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.’

यंदा १२ लाखांहून अधिक विद्यार्थी २.७ लाखांहून अधिक शिक्षक आणि ९० हजारांहून अधिक पालकांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रनसाठी नोंदणी केली होती.

Take the exam in a festive atmosphere: Prime Minister Narendra Modi’s appeal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात