वीर दासवर कठोर कारवाई करा, विशिष्ठ जातीला लक्ष्य करणे सौम्य दहशतवाद, कंगना रनौटची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जेव्हा तुम्ही सगळ्या भारतीय पुरुषांना गँग रेपिस्ट म्हणून बोलतात तेव्हा जगभरातील लोकांना भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरी करण्यास प्रोत्साहीत करत आहात. अशा प्रकारे एका विशिष्ट जातीला लक्ष्य करणे हे सौम्य दहशतवाद आहे. वीर दास विरोधात कठोर करवाई झालीच पाहिजे अशी मागणी अभिनेत्री कंगना रनौटने केली आहे.Take stern action against Veer Das, targeting specific castes, mild terrorism, Kangana Ranauts demand

अभिनेता आणि कॉमेडियन वीर वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. एवढचं काय तर सोशल मीडियावर अनेकांनी त्याने भारताचा अपमान केल्याचे म्हटले आहे. यावर आता अभिनेत्री कंगना रणौतने वीर दासवर टीका केली आहे.



कंगनाने याबाबत लिहिलेल्या इन्स्ट्राग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, बंगालमध्ये झालेल्या दुष्काळानंतर चर्चिल म्हणाल होते की हे भारतीय सशांसारखे आहेत आणि ते असेच मरणार आहेत.भारतात भुकेमुळे होणाºया लाखो लोकांच्या मृत्युसाठी त्यांनी भारतीयांच्या लैंगिक इच्छा/प्रजनन क्षमता दोषी असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारे एका विशिष्ट जातीला लक्ष्य करणे हे सौम्य दहशतवाद आहे.

सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, दासने देशाच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचे आणि कोविड-१९ महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे.

वीर दासने म्हटले आहे की, मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निदेर्शांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाºया शेतकºयांवर धावून जातो.

Take stern action against Veer Das, targeting specific castes, mild terrorism, Kangana Ranauts demand

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात