विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नीच औरत, हड्डी पसली तुडवा देंगे और ऐसी जगह गाडेंगे की किसी को पता भी नही चलेगा…!!, असे म्हणत विभव कुमार याने आपल्या छाती, पोटावर आणि डोक्यावर मारत तुडवले, हे सगळे स्वाती मालीवाल यांनी आपल्या जबानीने सांगितले आणि पोलिसांनी त्यानंतर दाखल केलेल्या FIR मध्ये नोंदविले. swati maliwal fir vibhav kumar bit her
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या हजेरीत केजरीवालांचा पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली. यासंदर्भातल्या बातम्या सगळीकडे आल्या, पण त्याहीपेक्षा स्वाती मालीवाल यांच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी नोंदविलेल्या FIR मधून आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या. अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी नेमके काय घडले??, कसे घडले??, याचे तपशील पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्या जबानीच्या आधारावरच नोंदवले.
स्वाती मालीवाल सोमवारी सायंकाळी अरविंद केजरीवालांच्या घरी पोहोचल्या. आधी त्या कार्यालयात गेल्या. परंतु ती तिथे नाहीत हे पाहून त्या निवासस्थानात गेल्या. तेथे त्यांना कर्मचाऱ्यांनी ड्रॉइंग रूममध्ये बसायला सांगितले मुख्यमंत्री घरातच आहेत. ते लवकरच भेटतील असे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने आपण ड्रॉइंग रूम मध्ये वाट पाहत बसून राहिलो. परंतु काही वेळातच बिभव कुमार तिथे आला आणि त्याने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याच्या अशा अचानक शिव्या देण्याने मी थोडी घाबरले काहीशी सावरून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने मला कोचवरून खेचून खाली पाडले. माझ्या पोटात आणि छातीवर लाथा मारल्या. मी कळवळून ओरडत होते, पण तिथे कोणी मदतीला आले नाही. माझे पिरीयड्स चालू आहेत. मला मारू नको, असे मी बिभवला वारंवार सांगितले. परंतु तो बिलकुलच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने माझे डोके आपल्या टेबलावर आपटले मला परत खाली पाडले आणि तो मला पोटात छातीवर लाथा मारून तुडवत होता.
उसने महिला सांसद को एक थप्पड़ मारा , वो लड़खड़ाई सदमें में थी , तभी एक थप्पड़ और फिर एक और वो ज़मीन पर गिर पड़ी महिला सांसद ज़मीन पर गिरी चिल्ला रही थी उसने सांसद की शर्ट खींची , सारे बटन टूटते चले गये , शर्ट खुल गई उसने छाती पर मारा , स्तनों पर मारा फिर लातें मारी ,… pic.twitter.com/DeHukT72o7 — Kapil Mishra (Modi Ka Pariwar) (@KapilMishra_IND) May 17, 2024
उसने महिला सांसद को एक थप्पड़ मारा , वो लड़खड़ाई
सदमें में थी , तभी एक थप्पड़ और फिर एक और
वो ज़मीन पर गिर पड़ी
महिला सांसद ज़मीन पर गिरी चिल्ला रही थी
उसने सांसद की शर्ट खींची , सारे बटन टूटते चले गये , शर्ट खुल गई
उसने छाती पर मारा , स्तनों पर मारा
फिर लातें मारी ,… pic.twitter.com/DeHukT72o7
— Kapil Mishra (Modi Ka Pariwar) (@KapilMishra_IND) May 17, 2024
तू कैसे नही हमारी बात मानेगी?? कैसे नही मानेगी?? तेरी औकात क्या है की हमको ना कर दे!! तू समजती क्या है खुद को नीच औरत!!, असे म्हणत बिभव कुमार मला सतत मारत राहिला. मी कळवळून ओरडले तरी तिथे कोणीही मदतीला आले नाही. मी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून माझा चष्मा शोधला. चष्मा घालून मी माझ्या मोबाईल वरून 112 नंबरवर फोन केला. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तो आणखी चिडला. कर ले तुझे जो करना है, तू हमारा कुछ नही बिघड सकती. तेरी हड्डी फसली जुडवा देंगे और ऐसी जगह गाडेंगे की किसी को पता भी नही चलेगा!! अशा शिव्या देतच तो तिथून बाहेर गेला. त्याने मेन गेटवरच्या सेक्युरिटी गार्ड्सना बोलवून आणले आणि मला बाहेर घालवायला सांगितले. सिक्युरिटी गार्डने मला बाहेर आणले. मी थोडावेळ आऊट हाऊस मध्ये बसले तेवढ्यात पोलीस आले आणि पोलिसांनी मला मदत करून सिविल लाईन्स मधल्या माझ्या घरापर्यंत पोहोचवले.
मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये असे काही घडू शकते याची मी कल्पनाही केली नव्हती. मी अरविंद केजरीवालांना फक्त भेटायला गेले होते. परंतु तिथे मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मला ते तुडवून मारहाण करतील असे मला कधीच वाटले नव्हते, पण ते घडल्याने मी घाबरले होते.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल
हे सगळे स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना जबानीत सांगितले. पोलिसांनी या सगळ्या घटना क्रमाची नोंद FIR मध्ये केली आहे. पोलिसांनी नोंदविलेल्या FIR मधील मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमारला चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली. परंतु ती नोटीस घेण्याचे त्याच्या पत्नीने नाकारले. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित नोटीस त्याच्या घरावर चिटकवली. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनीही त्याच्या घरावर नोटीस चिकटवली आहे. त्यामुळे आता बिभव कुमार एकाच वेळी राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांच्या चौकशी आणि तपासाच्या घेऱ्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App