दहशतवादी अफजल गुरूशी जोडले नाव, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना ( Atishi Marlena ) यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबतच राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनीही हल्लाबोल केला आहे.
स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, दिल्लीसाठी आजचा दिवस खूप दुःखद आहे. आज एका अशा महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले जात आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिला.
दहशतवादी अफझल गुरूला वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांनी माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लिहिला. त्यांच्या मते अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटात गोवण्यात आले होते. आतिशी मार्लेना या फक्त ‘डमी सीएम’ असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो! असं मालीवाल म्हणाल्या आहेत.
आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सचदेवा म्हणाले की, आधी सिसोदिया यांना खाती मिळाली, आता आतिशी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मनीष सिसोदिया यांच्या दबावामुळे केजरीवाल यांना आतिशी यांना मुख्यमंत्री बनवावे लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App