विशेष प्रतिनिधी
जयपूर :एका बाजुला कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी स्वातंत्र्यवी सावरकरांवर गलिच्छ टिका करून त्यांचा अपमान करतात. परंतु, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदू राष्ट्र मुद्द्याचं समर्थन केलं आहे. त्यामुळे कॉँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.Swatantryaveer Savarkar did not make a mistake to call it Hindu Rashtra, Rajasthan Congress president praised Savarkar
जयपुरमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या एका कार्यक्रमात डोटासरा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावकर यांनी हिंदू राष्ट्र असल्याचं सांगून चूक केली नाही. याशिवाय डोटासरा यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांचे स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठे योगदान होते यावर कोणाचंच दुमत नसेल.
डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. अनेका नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादानंतर डोटासरा यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं वक्तव्य हे पक्षाच्या विरोधात नसल्याची त्यांनी भूमिका मांडली.
स्वातंत्र्यवीर सावकर स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. ही बाब नाकारू शकत नाही. ते स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असतं तर त्यात काहीच चूक नाही. स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्राची मागणी योग्यच होती. त्यावेळी आपलं संविधान लागू झाला नव्हता.
देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संविधानाची निर्मिती करण्यात आली. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी संविधानाचा स्वीकार केला. मात्र भावाशी भावाला लढविण्याचं कारस्थान भाजप आणि आरएसएस करतात.डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने ट्वीट करीत याबाबत प्रतिक्रिया दिली व यामध्ये सावरकरांनी इंग्रजांकडून माफी मागितल्याचा उल्लेख केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App