टिळकांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सावरकरांनी सांगितलेली लोकमान्य संबोधनाची कथा

विनायक ढेरे

नाशिक : बाळ गंगाधर टिळकांना “लोकमान्य टिळक” हे नाव कसे पडले, याची कथाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी टिळक जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात पुण्यातील मुख्य कार्यक्रमात सांगितली आहे. त्याचा ऑडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. किंबहुना टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या मुख्य कार्यक्रमाचे सावरकरांचे संपूर्ण भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे.How bal gangadhar tilak became Lokmanya, Veer savarkar told the story

लोकमान्य टिळकांच्या देशव्यापी जन्मशताब्दी समारंभाचे सावरकर हे प्रमुख वक्ते होते. लोकनायक बापूजी अणे, सेनापती बापट, पुण्याचे काँग्रेसचे महापौर बाबूराव सणस, शेतकरी कामगार पक्षाचे नेते केशवराव जेधे, समाजवादी पक्षाचे एस. एम. जोशी, शेड्युल्ड कास्ट पक्षाचे – कम्युनिस्ट पक्षाचे खाडिलकर आदी सर्वपक्षीय नेते त्यावेळी व्यासपीठावर हजर होते. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दीचा भव्य समारंभ साजरा केला होता.

या सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबईला सावरकर सदनात जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. त्याचा अतिशय गौरवास्पद उल्लेख सावरकरांनी आपल्या भाषणात केला होता. दिल्ली – बंगालपासून विदर्भापर्यंत मोठमोठ्या प्रांतांमधून टिळक जन्मशताब्दी साजरी झाली होती. पण सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन पुण्यात भव्य कार्यक्रम केल्याने आपण हे निमंत्रण स्वीकारल्याचे सावरकारांनी सांगितले होते.या भाषणात सावरकरांनी टिळकांच्या “लोकमान्यत्वाची” कथा सांगितली होती. ते म्हणाले, “मला आठवतेय, टिळकांना लोकमान्य नाव कसे पडले ते… मी त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळी काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांनी “काळ” या त्यांच्या वृत्तपत्रात “लोकमान्य की राजमान्य” या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यावेळी एकमेकांना रा. रा. म्हणजे राजमान्य राजश्री अशी लिहिण्याची पध्दत होती.

परंतु, ही राजमान्यता स्वदेशी नसून परकीयांची म्हणजे ब्रिटिशांची होती. म्हणून काळकर्त्यांनी “राज्यमान्य” हा शब्द कोणी कोणाला संबोधताना वापरूच नये असे लिहिले होते. त्या लेखात त्यांनी टिळकांचा उल्लेख त्यांनी लोकमान्य या संबोधनाने केला होता. तेव्हापासून टिळकांना लोकमान्य या मायन्याची पत्रे यायला लागली आणि संपूर्ण देशातील नेत्यांनी आणि जनतेने त्यांना लोकमान्य या नावाने संबोधण्यास सुरूवात केली. सावरकरांच्या या भाषणाला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळून मोठी प्रसिद्धी लाभली होती.

टिळकांचे सगळे समकालीन पुढारी पंजाब सिंह लाला लजपत राय, बाबू बिपिन चंद्र पाल, योगी अरविंद घोष, सरदार अजित सिंह, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मौलाना महंमद अली, मौलाना शौकत अली, सय्यद हसन रेझा, महंमद अली जिना, सुब्रह्मण्यम भारती, के. कंकय्या, रवींद्रनाथ टागोर, पंडित मोतिलाल नेहरू हे आणि अन्य पुढारी टिळकांचा गौरव लोकमान्य या नावाने करायला लागले. या प्रत्येकाने आपापल्या आत्मचरित्रांमध्ये टिळकांचा गौरव लोकमान्य या संबोधनाने केला आहे.

यानंतरच्या पिढीतील महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील आपल्या आत्मचरित्रांमधून आणि इतिहास ग्रंथांमधून टिळकांचा गौरव लोकमान्य या संबोधनाने केला आहे.

How bal gangadhar tilak became Lokmanya, Veer savarkar told the story

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*