Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सोमेंदू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे मदत साहित्य चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अधिकारी बंधूंनी केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून एक लाख रुपये किमतीचे सरकारी मदत साहित्य चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ममतांचा पराभव केल्याने त्या शुभेंदूंवर सूड उगवत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. Suvendu Adhikari, Brother Accused Of Stealing Relief Material Case Filed In West Bengal
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सोमेंदू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे मदत साहित्य चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अधिकारी बंधूंनी केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून एक लाख रुपये किमतीचे सरकारी मदत साहित्य चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. ममतांचा पराभव केल्याने त्या शुभेंदूंवर सूड उगवत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कांठी नगरपालिका प्रशासकीय मंडळाचे सदस्य रत्नदीप मन्ना यांनी 1 जून रोजी भाजप नेते आणि त्यांच्या भावाविरुद्ध कांठी पोलिसांत फिर्याद दिली. सोमेंदू हे कांठी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षही राहिले आहेत.
या तक्रारीत असे म्हटले आहे की, 29 मे रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास शुभेंदू आणि त्यांच्या भावाच्या सांगण्यावरून नगरपालिका कार्यालयाच्या गोदामाचे कुलूप जबरदस्तीने उघडले गेले आणि येथून सरकारी त्रिपाल नेण्यात आले. त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या तक्रारीत असे सांगितले गेले होते की, भाजप नेत्यांनी चोरीच्या वेळी केंद्रीय सशस्त्र दलांचाही वापर केला.
कोलकाता पोलिसांनी शुभेंदूंच्या जवळच्या साथीदाराला फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्या दिवशी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये पाटबंधारे व जलमार्ग मंत्रालयात नोकरीच्या बहाण्याने एका व्यक्तीच्या फसवणुकीसाठी राखल बेराला अटक केली होती. फिर्यादीचा आरोप आहे की, त्याने दोन लाख रुपये दिले, तरीही त्याला नोकरी मिळाली नाही.
विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम सीटवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 1956 मतांनी पराभूत केले. निवडणुकीत प्रथमच भाजप मुख्य विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. एकूण 292 जागांपैकी तृणमूलने 213 जागा जिंकल्या. भाजपच्या खात्यात 77 जागा आल्या. इतरांनी दोन जागा जिंकल्या. त्याचवेळी कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीचे खातेदेखील उघडले नाही.
Suvendu Adhikari, Brother Accused Of Stealing Relief Material Case Filed In West Bengal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App