जल्लीकट्टूवर आज सर्वोच्च निकाल, 5 महिन्यांपूर्वी ठेवला होता राखून; तामिळनाडू सरकारचा युक्तिवाद- खेळात बैलांवर क्रूरता नाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तामिळनाडू आणि महाराष्ट्रात जल्लीकट्टू खेळाला परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचे 5 न्यायाधीशांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे.Supreme verdict on Jallikattu today, reserved 5 months ago; Tamil Nadu Government’s Argument – There is no cruelty to bulls in sport

8 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.



तामिळनाडू सरकारने सांगितले – जल्लीकट्टूमध्ये बैलांवर कोणतेही क्रौर्य नाही

गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला विचारले होते की, जल्लीकट्टूसारख्या बैलांना नियंत्रित करण्याच्या खेळात कोणत्याही प्राण्याचा वापर केला जाऊ शकतो का? यावर सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, जल्लीकट्टू हे केवळ मनोरंजन नाही. उलट, हा एक मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या खेळात बैलांवर क्रूरता होत नाही. पेरू, कोलंबिया आणि स्पेनसारखे देशदेखील त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा भाग मानतात. पुढे, सरकारने असा युक्तिवाद केला की ‘जल्लीकट्टू’मध्ये सहभागी असलेल्या बैलांना शेतकरी वर्षभर प्रशिक्षण देतात जेणेकरून कोणताही धोका होऊ नये.

जल्लीकट्टूच्या खेळात खेळाडूंना खुल्या बैलावर नियंत्रण ठेवावे लागते. जल्लीकट्टूला एरु थाझुवुथल आणि मनकुविरट्टू असेही म्हणतात. हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे. यात बैलाला गर्दीत सोडले जाते आणि खेळाडू त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Supreme verdict on Jallikattu today, reserved 5 months ago; Tamil Nadu Government’s Argument – There is no cruelty to bulls in sport

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात