ज्ञानवापीतील व्यास तळघरातील पूजाअर्चा थांबविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ज्ञानवापी मधील व्यास तळघरातील पूजा थांबविण्यास सुप्रीम कोर्टाने आज नकार देत मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली. अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केल्यानंतर हिंदू पक्षाने व्यास तळघरात नियमित पूजाअर्चा सुरु केली होती. ती आता नियमितपणे चालू आहे. Supreme Court’s refusal to stop worship at Vyas basement in Gyanvapi

मात्र, त्यावर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेणारा अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल केला होता. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्यास नकार देत मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली.

ज्ञानवापीच्या व्यास तळघरामध्ये हिंदू पद्धतीनुसार पूजाअर्चा सुरू आहे. त्याचबरोबर वरच्या भागात मुस्लिम नमाज पठण करत आहेत. हे दोन्हीही निर्धोकपणे सुरू असेल, तर त्यामध्ये कोणी अडथळा आणण्याचे कारण नाही. ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजा थांबवण्याचे कारण नाही, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे ज्ञानवापीवरचा मुस्लिम पक्षाचा दावा आता कायदेशीर दृष्ट्या ढिल्ला पडत चालला आहे.

Supreme Court’s refusal to stop worship at Vyas basement in Gyanvapi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub