वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सन 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कनिष्ठ न्यायालयांनी क्लीन चिट दिली होती. मात्र त्याला आव्हान देणारी याचिका आता थेट सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली असून, मोदी यांना देण्यात आलेली क्लीन चिट कायम ठेवली आहे. Supreme Court’s clean chit to Narendra Modi
या दंगलीत मारले गेले काँग्रेसचे खासदार केसांच्या खाली अहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र जाकिया जाफरी यांचे हेतु विशिष्ट आणि राजकीय आहेत, अशी टिपण्णी करतात सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
मोदींना क्लीन चिट
2002 साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीच्या अहवालात नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या अहवालाविरोधात काँग्रेसच्या नेत्या एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, ए. एम. खानविलकर आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी म्हणजेच 9 डिसेंबर 2021 रोजी राखून ठेवला होता.
काय आहे प्रकरण?
28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद येथील गुलबर्गा सोसायटीत झालेल्या दंगलीत जाळपोळ झाली होती. यामध्ये काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांच्यासह 68 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. या दंगलीचा एसआयटीने तपास केला. या तपासामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली होती.
– मोदींभोवती संशयाचे जाळे
मात्र या मुद्द्यावरून मोदींविरोधात कायम संशय असे वातावरण राहिले होते तसेच मोदींना क्लीन चिट देण्याचा निर्णय विरोधात एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
– जाकिया जाफरी यांचे हेतू राजकीय
त्यावर निकाल देत सुप्रीम कोर्टाने मोदींना दिली क्लीन चिट योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे तसेच जाकिया जाफरी त्यांचे हेतू राजकीय आहेत. सरकारने नेमलेल्या विविध संस्थांच्या कार्यपद्धतीवर जाफरी यांनी अनावश्यक आक्षेप घेतले आहेत त्या संस्थांच्या निष्कर्षावर राजकीय हेतूने संशय निर्माण केला अशी परखड टिपण्णी खंडपीठाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App