Door To Door Vaccination : कोविड लसीकरणाच्या ‘डोअर टू डोअर’ मागणीवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, देशात लसीकरण सुरळीत सुरू आहे. 60 टक्के लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. Supreme Court Says Door To Door Vaccination Not Possible
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोविड लसीकरणाच्या ‘डोअर टू डोअर’ मागणीवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, देशात लसीकरण सुरळीत सुरू आहे. 60 टक्के लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
त्याचबरोबर, कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा मानून कुटुंबाला भरपाई देण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कोर्टाने म्हटले की, तेथे मोठ्या प्रमाणात मृत्यू आहेत. हे दुर्दैवी आहे. परंतु असे म्हणता येणार नाही की, प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला आहे.
भारताने कोरोनाविरोधी लसीकरणात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ११ दिवसात देशाने एकदा नव्हे तर तीन वेळा १ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरणाचा विक्रम केला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण, तिसऱ्या लाटेचा धोका असण्याची शक्यता आहे. तसे इशारे वारंवार देण्यातही आले आहेत. तसेच लसीकरण हाच कोरोनापासून बचाव करण्याचा हा एकमेव उपाय आहे. तसेच ती काळाची गरज असल्याने केंद्र सरकारने लसीकरण मोहीम सुरूच ठेवली आहे. त्या अंतर्गत लसीकरणाचा धडाका उडवून दिला आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी नागरिकही पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ६ सप्टेंबर अखेर ६९ कोटी लसीचे डोस दिले आहेत.
Supreme Court Says Door To Door Vaccination Not Possible
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App