विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आजची सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली असून आता बु़धवारी ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट या सुनावणी निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणे एकाच वेळी ऐकणार आहे. न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती माहेश्वरी यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. आता निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवर बुधवारी 2 मार्चला एकाच वेळी ही सुनावणी होणार आहे.Supreme Court postpones OBC reservation hearing; Now hearing on March 2
– ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; ठाकरे – पवार सरकारला दणका का बसला?
एम्पिरिकल डेटा च्या वादात जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करता येणार नाहीत. ओबीसी आरक्षणाशिवाय 27 टक्के जागा आणि 73 टक्के जागांचे निकाल एकदम लावा, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारच्या भूमिकेला न्यायालयाने दणका दिला होता. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करायला देखील न्यायालयाने नकार दिला होता.
यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेला मोठा दणका बसला. एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. पण आधीच जाहीर झालेल्या निवडणुक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीमो कोर्टाने स्पष्ट नकार देत, दिला या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत. त्यामुळे १०५ नगरपंचायतींची निवडणुक ओबीसी आरक्षणाशिवाय ठाकरे पवार सरकारला घ्यावी लागली. 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला लागला.
२७ टक्के ओबीसी जागा जनरल कॅटेगिरीतून अर्थात खुल्या प्रवर्गातून लढवल्या जाणार असल्याचे नोटीफिकेशन एका आठवड्यात निवडणुक आयोगाने काढावे लागले होते. १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून लढवावी लागली. ओबीसी आरक्षणासाठी ट्रीपल टेस्टची अंमलबजावणी न करता अध्यादेश का काढला असं सांगत सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले होते.
ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांचे निकाल कळवा; सुप्रीम कोर्टाने आदेश
राज्य सरकारला धक्का
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा झटका बसला. इम्पेरिकल डेटा देण्यासंदर्भात राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आली होती. इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही असं प्रतिज्ञापत्राद्वारे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं. त्याआधारे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावी ही याचिका राज्य सरकारने केली होती. ती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीय. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे. दरम्यान राज्य सरकारनं राज्य सरकार ३ महिन्यात डेटा गोळा करण्यास तयार असल्याचं कोर्टात सांगितलंय.
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं
केंद्राने राज्याला इम्पेरीकल डाटा द्यावा किंवा तसा डाटा राज्य सरकार तयार करेपर्यंत संपूर्ण निवडणूकच रद्द करा, अशी याचिका राज्य सरकारने केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, राज्याने आरक्षण लागू करण्यासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला हवी. पण त्यासाठी केंद्राने डाटा शेअर करावाच, असे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत. कारण केंद्राच्या म्हणण्यानुसार, तो डाटा निरुपयोगी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App