वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या पीठाने विविध राज्यांत दाखल गुन्ह्यांमध्ये नूपुरविरोधातील पोलिस कारवाईला स्थगिती दिली. कोर्ट म्हणाले, या आदेशानंतर एखादा नवा गुन्हा दाखल झाल्यास त्यातही पोलिस कारवाई करणार नाहीत. तक्रार दाखल करणाऱ्यांना कोर्टाने नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. यावर पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होईल.Supreme Court extends Nupur Sharma’s arrest till August 10; Suspension of action
नूपुर यांच्या हत्येसाठी घुसखोरी; पाकिस्तानी तरुण अटकेत
बीएसएफने राजस्थानातील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरून २४ वर्षांच्या पाकिस्तानी तरुणाला अटक केली आहे. त्याचे नाव रिझवान अख्तर आहे. तो पाकिस्तानातील पंजाबचा रहिवासी आहे. त्याच्याकडे दोन चाकू आणि काही पुस्तके आढळली. बीएसएफ अधिकारी म्हणाले, १६ जुलैच्या रात्री ११ वाजता त्याला राजस्थानातील गंगानगर सीमेवर अटक करण्यात आली. अजमेरला जाणार होतो, असे त्याने आधी सांगितले. नंतर म्हणाला, नूपुरला धडा शिकवायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App