वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील डेरा इस्माईल खान लष्करी तळावर आत्मघाती हल्ला झाला आहे. यामध्ये पाकचे 23 जवान मृत्युमुखी पडले. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात अनेक जवान झोपेतच ठार झाले. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, 11 डिसेंबरला पहाटे 2:30 वाजता दहशतवाद्यांनी हल्ला केला.Suicide attack on Pak military base; 23 Pakistani soldiers killed; 6 terrorists were also killed
लष्करी चौकीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने सुरुवातीला हाणून पाडला. यानंतर दहशतवादी स्फोटकांनी भरलेल्या वाहनासह लष्करी चौकीत घुसले. जिओ न्यूजनुसार, आत्मघातकी हल्ल्यात लष्करी चौकीची इमारत कोसळली.
पाक लष्कराने सर्व 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
लष्कराच्या कारवाईत 21 दहशतवादी मारले गेले
त्याचवेळी डेरा इस्माईल खान आणि कुलाची परिसरात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईत 21 दहशतवादी मारले गेले. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या म्हणण्यानुसार, मारले गेलेले दहशतवादी अनेक हल्ल्यांमध्ये सामील होते. त्यांच्या लपलेल्या ठिकाणांवरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
नोव्हेंबरमध्ये मियांवली एअरबेसवर हल्ला
याआधी 4 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर हल्ला झाला होता. सशस्त्र आत्मघाती हल्लेखोर हवाई दलाच्या प्रशिक्षण तळात घुसले होते. दहशतवादी पायऱ्यांवरून भिंत चढून एअरबेसमध्ये घुसले होते.
पाकिस्तानी हवाई दलाने सर्व 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. चकमकीत एक इंधन टँकर आणि 3 विमाने उद्ध्वस्त झाली. वृत्तानुसार, तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने (टीजेपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App