विशेष प्रतिनिधी
दिल्ली : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लॉन्च केलेल्या बॅलिस्टिक मिसाइल अग्नि-5 या मिसाईलचे यशस्वीरीत्या परीक्षण करण्यात आले आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सेनेची ताकद देखील वाढली आहे. या मिसाइलची रेंज 5000 किलोमीटर इतकी आहे.
Successfully tested ballistic Agni-5 missile with a range of 5000 km!
काल संध्याकाळी 7.50 वाजता हे मिसाइल लॉन्च करण्यात आले होते. ‘हे मिसाईल फक्त चाचणी करण्यासाठी लॉन्च करण्यात आले होते.’ असे भारत सरकार द्वारा सांगण्यात आले आहे. या मिसाइलच्या परीक्षणामुळे शेजारील देश चीन आणि पाकिस्तान मात्र सध्या बेचैन आहेत. कारण या मिसाइलच्या यशस्वीरीत्या केलेल्या परीक्षणामुळे भारतीय सैन्याची ताकद अनेक पटीने वाढली आहे.
हे मिसाईल 5000 किलोमीटर दूर पर्यंत आपले लक्ष भेदू शकते. या मिसाईलचे इंजिन थ्री स्टेप इंजिन आहे. आणि यामुळेच त्यांची क्षमता आणि ड्युराअॅबिलिटी देखील वाढलेली आहे.
Akash Prime Missile : अचूक मारक क्षमता-रडार-ट्रॅकिंग डिवाइस…अत्याधुनिक शक्तिशाली आकाश प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;ठरणार शत्रूचा काळ…
या मिसाइलचे वजन 50,000 किलोग्रॅम आहे. तर लांबी 17.5 आहे. मिसाइलचा डायमीटर 2 मीटर आहे. या मिसाईलवर 1500 किलोग्रॅम वजना पर्यंतचे परमाणू हत्यार कनेक्ट करता येतात. थ्री स्टेज रॉकेट बुस्टर्स ही या मिसाईलची खासियत आहे. हे रॉकेट बूस्टर सॉलिड फ्यूलद्वारे ऑपरेट केली जाऊ शकतात. या मिसाईलच्या ध्वनीचा स्पीड 24 पटीने जास्त आहे. म्हणजेच एका सेकंदामध्ये 8.16 किलो मीटर दूरवर साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करू शकतात.
या मिसाइलची MIRV टेक्निक अतिशय खास आहे. मिसाइलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शस्त्रास्त्रे अटॅच करू शकतो. ज्या भागात वेपन्स अटॅच केली जातात मिसाईलच्या त्या भागाला वॉरहेड असे म्हणतात. भारताने असा दावा केला आहे की, पूर्ण आशिया, युरोप आणि आफ्रिका मध्ये कोणत्याही भागामध्ये या मिसाईलद्वारेही हल्ला करता येऊ शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App