आत्मनिर्भर भारताचे यशस्वी उड्डाण, पूर्णपणे स्वदेशी दोन अस्त्रांच्या चाचण्या यशस्वी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताचा नारा लष्करी सज्जतेमध्ये महत्वाचा ठरला आहे. डीआरडीओ ( संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय हवाई दल यांनी पूर्णपणे स्वदेशी विकसित अस्त्रांच्या (स्मार्ट अँटी-एअरफिल्ड वेपनच्य दोन यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत.Successful flight of self-reliant India, successful test of two indigenous weapons

उपग्रह नेव्हिगेशन आणि इलेक्ट्रो-ऑ प्टिकल सेन्सरवर आधारित वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनसह दोन्ही अस्त्रांच्या उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या.संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतात प्रथमच या वर्गाच्या बॉम्बची इलेक्ट्रो-ऑप्टिकल सीकर आधारित उड्डाण चाचणी घेण्यात आली. पहिल्या अस्त्राची चाचणी गेल्या गुरूवारी घेण्यात आली होती.



जैसलमेर येथील चंदन पर्वतरांगांवरून विमानाने प्रक्षेपित केलेली दुसरी उड्डाण चाचणी आज घेण्यात आली. इलेक्ट्रो-आॅप्टिकल कॉन्फिगरेशन इमेजिंग इन्फ्रा-रेड सीकर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे यामुळे लक्ष्याचा भेद करण्याची अचूक क्षमता आली आहे.

100 किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करण्यास हे अस्त्र सक्षम यंत्रणा आहे. याद्वारे हे 125 किलोग्रॅम वजनाचे युध्द सामान वाहून नेता येते. ही अस्त्रे सहजतेने सोडण्यात आली आणि नवीन रुपांतरित लाँचरद्वारे बाहेर काढण्यात आली. इच्छित लक्ष्य उच्च अचूकतेने मारले गेले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल आणि मिशनशी संबंधित संघांच्या सहयोगी प्रयत्नांचे कौतुक केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी या अस्त्राची कामगिरी आणि विश्वासार्हता सिद्ध झाल्याचे सांगत संघाचे अभिनंदन केले.

Successful flight of self-reliant India, successful test of two indigenous weapons

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub