अहिल्याबाई होळकर, झाशीच्या राणीसह महिलांच्या युध्दनितीचा अभ्यास, बनारस हिंदू विद्यापीठात शिकविले जाणार प्राचीन भारतीय युध्दतंत्र


विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद : बनारस हिंदू विद्यापीठ संरक्षण विषयक अभ्यासक्रम सुरू करत असून यामध्ये प्राचीन भारतीय युध्दतंत्रासोबतच अहल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह महिला राज्यकर्त्यांच्या रणनितीचाही अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय लष्करामध्ये आता महिलाही उच्च पदांवर जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे या अभ्यासाचे विशेष महत्व आहे.Study of Women’s Warfare with the, Ahalyabai HolkarQueen of Jhansi Rani Laxmibai, Ancient Indian Warfare to Be Taught at Banaras Hindu University

बनारस हिंदू विद्यापीठात ‘हिंदू स्टडीज’ विषयाच्या एमए अभ्यासक्रमात ४० विद्यार्थी असणार आहेत. हा कार्यक्रम या वर्षी पहिल्या बॅचमध्ये 40 विद्यार्थी असतील. विद्यापीठातील विविध विभागांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यता आला आहे. यामध्ये तत्त्वज्ञान आणि धर्म विभाग, संस्कृत विभाग, प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभाग आणि विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचा भाग असलेल्या भारत अध्यायन केंद्रांचा समावेश आहे.प्राचीन हिंदू युध्दतंत्राचा हा देशातील पहिला पूर्ण अभ्यसाक्रम असेल. यामध्ये वैदिक साहित्यातील संरक्षणविषयक संदर्भही अभ्यासले जाणार आहेत. ‘भारतीय सैन्य, विज्ञान आणि रणनीती’ नावाच्या एका पेपर अंतर्गत, शत्रू आणि मित्रांची व्याख्या, शत्रुची ताकद कमी करण्याचे मार्ग या विषयांवर मार्गदर्शन करणारे धडे असतील. महिला सैन्याची कल्पना, सैनिक छावणी आणि किल्ल्यांचे बांधकाम, युद्धासाठी योग्य वेळ आणि मार्ग, युद्ध धोरण आणि त्याची अंमलबजावणी अणि विजय आणि पराभवानंतरची रणनीती हे विषयही अभ्यासक्रमात असतील.

विद्याठातर्फे सांगण्यात आले की आपल्याकडच्या े वैदिक साहित्यात लष्करी विज्ञान आणि लष्करी धोरणांचे संदर्भ आहेत त्याचा आत्तापर्यंत अभ्यासच केला गेलेला नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून हिंदू लष्करी विज्ञान आणि रणनीतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वसिष्ठांची ‘धनुर्वेद संहिता’ आणि वैशंपायनची ‘नीती प्रकाशिका’, या संस्कृतमधील ग्रंथांचा अभ्यास केला जाणार आहे.

यामध्ये लष्करी रणनितीचे वर्णन असून आत्तापर्यंत त्यांचा अभ्यास झालेला नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणांच्या निर्मितीसाठी या ग्रंथांमधील ज्ञान आणि मूल्ये अत्यंत महत्वाची आहेत. देशाच्या बाह्य शत्रूंना कसे सामोरे जावे याविषयी आखण्याच्या धोरणांचाच नव्हे तर देशाच्या सुरक्षेला धोका असणाऱ्या अंतर्गत घटकांचाही उल्लेख त्यामध्ये आहे. चीनसह अनेक देश सध्याच्या संदर्भात त्यांचे प्राचीन लष्करी ज्ञान वापरतात. भारतालाही त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे.

दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमात नऊ अनिवार्य आणि सात ऐच्छिक पेपर असणार आहेत. मुख्य विषयांमध्ये हिंदू सभ्यता, समाज, संस्कृती आणि पद्धतींच्या तत्त्वांची समज विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ऐच्छिक विषयांमध्ये कायदा, राजकारण, अर्थशास्त्र, कला आणि भाषाशास्त्र यासारख्या क्षेत्रातील ज्ञान दिले जाईल.

Study of Women’s Warfare with the, Ahalyabai HolkarQueen of Jhansi Rani Laxmibai, Ancient Indian Warfare to Be Taught at Banaras Hindu University

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात