सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. Strong step of central government! The general public can now complain directly to the Prime Minister’s Office; Learn exactly how?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना थेट आपली तक्रार पंतप्रधानांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी वेबसाईट सुरू केली आहे. वेळ, पैसा खर्च करून देखील कामाच्या बाबतीत लोकांच्या पदरी निराशाच येते. केंद्र सरकारद्वारे अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहे. मात्र कधी कधी अशा योजनांचा लाभ मिळण्यास खूप उशीर होतो.
सर्वसामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. अवघ्या काही मिनिटात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
अवघ्या काही मिनिटांत करू शकता तक्रार; अतिशय सोपी आहे प्रक्रिया
या पेजवर तक्रारी दाखल करता येतात.
ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवणं काही कारणामुळे शक्य नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्ही तुमची तक्रार पोस्टाने पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता. पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011. या पत्त्यावर पत्र पाठवता येईल. फॅक्सद्वारे तक्रारही नोंदवता येते. याकरता 011-23016857 या फॅक्स क्रमांकावर फॅक्स पाठवता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App