विशेष प्रतिनिधी
मुंबई : सलग तीन दिवसांच्या सुट्टयानंतर आज शेअर बाजार उघडताच त्यात मोठी तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 334.03 अंकांची वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंतची सार्वकालीन उच्चांकी पातळी गाठत सेन्सेक्स निर्देशांकाने 77,235.31 टप्पा गाठला, तर निफ्टीमध्ये 108.25 अंकाची वाढ झाली. ज्यामुळे निफ्टी निर्देशांक पहिल्यांदाच 23,573 वर पोहोचला. Stock market rally; Sensex crosses 77000, Nifty rises too!!
सेन्सेक्समधील टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. तर मारुती, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी रिॲलिटी आणि ग्राहपयोगी वस्तू याक्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक आघाडी घेतली. बाजारात इतर ठिकाणी तेजी दिसत असताना फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर लाल रंगात दिसत होते.
ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यामध्येही 0.5 % वाढ दिसली. ओएनजीसी शेअरने 1.2 % टक्क्यांची वाढ झाली. केंद्र सरकारने 15 जून पासून कच्च्या इंधनावरील विंडफॉल कर 5,200 रुपयांवरून 3,250 रुपये प्रति मेट्रिक टनावर आणल्यामुळे त्याचाही प्रभाव बाजारावर झाला. निवडणुकीच्या निकालानंतर सरकारी कंपन्यांमध्येही एक टक्क्याची वाढ पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, आयआरसीटीसी, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
गुंतवणूकदारांच्या बाजारमूल्यात २ लाख कोटींची वाढ
14 जून रोजी बीएसईवर अधिसुचित असलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य एकूण 434 लाख कोटी इतके होते. आज म्हणजे 18 जून रोजी यामध्ये वाढ होऊन अधिसूचित कंपन्याचे बाजारमूल्य 436 लाख कोटींवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचा तब्बल दोन लाख कोटींनी नफा वाढला असल्याचे दिसते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App