विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशभरातील किमान पंधरा कोटी मुले आणि तरुण हे औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर असून २५ कोटी एवढी लोकसंख्या ही साक्षरतेच्या प्राथमिक चौकटीमध्ये देखील येत नाही.’’ अशी खळबळजनक माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.Still 25 Cr people not getting proper education
ते म्हणाले ‘‘ देशातील साधारणपणे ३ ते २२ वर्षे वयोगटातील विविध शैक्षणिक संस्थांमधील लहान मुले आणि तरुणांचा विचार केला तर त्यांची एकत्रित संख्या ३५ कोटी एवढी भरते पण देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केला हा आकडा ५० कोटींच्या घरामध्ये जातो.’’
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’कडून (सीआयआय) आयोजित ‘रोजगार निर्मिती आणि उद्यमशीलता’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या जनगणनेनुसार १९ टक्के लोकसंख्या ही निरक्षर होती.
आता ७५ वर्षांनंतर साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोचले आहे, याचाच अर्थ आणखी २० टक्के लोक (साधारणपणे २५ कोटी) प्राथमिक साक्षरतेच्या चौकटीमध्ये येत नाहीत, असेही प्रधान यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App